Wednesday, May 30, 2012

अखिलम् मधुरम्

जीवन अधिक आनंददायी बनण्यासाठी जरूर ऐका
अखिलम् मधुरम्

संस्कृतमधील श्र्लोकांची नित्यपठणे अनुभवणारी मालिका

पुण्याच्या सौ. वैभवी श्रीकांत शेटे यांनी अनेक वर्षाची साधना करुन अतिशय मधुर स्वरात आणि संस्कृतच्या उच्चारणात गायलेल्या विविध स्त्रोत्रांची तीन भागांची मालिका फौउंटन म्युझिक कंपनीने नुकतीच बाजारात आणली आहे.

माणसाला उत्तम आरोग्य लाभावे..काही होऊच नये हे उत्तम.पण तरीही अशा स्त्रोस्त्रांच्या केवळ ऐकण्याने जर त्यावर काही काळ मात होत असेल तर अशी स्त्रोस्त्रे रोज तुमच्या घरात ..घरातील वातावरणात भारली गेली पाहिजेत.

आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन `गीर्वाणवाणी` मध्ये आजही सकाळी सहा ते सातच्या दरम्यान सस्कृंतमधील ही स्त्रोस्त्रे नित्यमियमाने ऐकविली जातात.. उत्तम उच्चारण आणि संस्कृतचा योग्य आणि सुस्पष्ट वापर...यातून विविध संस्कृतची ही स्त्रोस्त्रे..पुन्हा पुन्हा नव्हे..रोज ऐकाविशी वाटतात...याची सुरवात करणा-या सौ. वैभवी श्रीकांत शेटे यांनी आता या स्त्रोस्त्रपठणाच्या सीडी तयार केल्या आहेत. पूर्वी त्या स्वतः याची निर्मिती करायच्या पण आता फौउंटनचे कांतीलाल ओसवाल यांनी आपल्या कंपनीच्याद्वारे या तीन भागातल्या `अखिलम् मधुरम्` ची निर्मिती बाजारात आणली.

उत्तम निर्मितीमूल्ये असलेली ही सीडी. असून त्यासोबत श्र्लोकांची माहिती देणारी पुस्तीकाही आहे. त्यात मूळ संस्कृत स्त्रोस्त्र..त्याचा मराठीत अर्थ आणि त्याचाच इंग्रजीत केलेला अनुवादही नव्याने समाविष्ट केला आहे.

`पारंपारिक पध्दतीने होणा-या स्त्रोस्त्रपठणाऐवजी स्त्रोस्त्राचा आशय, आत्मा न गमावता मुख्य गाभा कायम ठेऊन, निरनिराळ्या रागात बांधलेले व अत्यंत श्रवणीय असेच अखिलम् मधुरम्`चे वर्णन करावे लागेल.`

संस्कृत श्लोकगायनासाठी आवश्यक असलेले सुस्पष्ट, तरीही सहज उच्चारण. मुळात गोड असलेला व शास्त्रीय संगीताचा बैठक लाभल्याने अधिकच सुरेल झालेला स्वर. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या स्त्रोस्त्रांवर असलेल्या गाढ श्रध्देमुळे स्वरांत उतरलेले मंगलभाव... या सा-यातून ही तीन भागांची स्त्रोस्त्रपठण मालिका ऐकणा-याचे कान, मन आणि घर प्रसन्न करेल यात शंका नाही.

केवळ व्यवसाय हाच याचा उद्देश नाही. तर यातल्या काही स्त्रोस्त्रांच्या केवळ ऐकण्यामुळे..रक्तदाब, निद्रानाश, डोळ्यावरचा ताण नाहीसा होणे, मन शांत होणे असे काही शारीरीक आरोग्य सुधारण्यास यातील काही स्त्रोस्त्रांची मदत होईल. आरोग्यला हितकारक अशा गोष्टी यात असल्यामुळे काळ पाहून ती स्त्रोस्त्रे ऐकली तर तुम्ही नक्कीच अधिक आनंददायी बनाल.

देशातल्या सर्व सीडीदुकानात ह्यास्त्रोस्त्राची सीडी उपलब्ध आहे.



http://www.justdial.com/Pune/fountain-music-company-%3Cnear%3E-budhwar-peth/020PXX20-XX20-110916115447-Q6G5