Wednesday, May 30, 2012

अखिलम् मधुरम्

जीवन अधिक आनंददायी बनण्यासाठी जरूर ऐका
अखिलम् मधुरम्

संस्कृतमधील श्र्लोकांची नित्यपठणे अनुभवणारी मालिका

पुण्याच्या सौ. वैभवी श्रीकांत शेटे यांनी अनेक वर्षाची साधना करुन अतिशय मधुर स्वरात आणि संस्कृतच्या उच्चारणात गायलेल्या विविध स्त्रोत्रांची तीन भागांची मालिका फौउंटन म्युझिक कंपनीने नुकतीच बाजारात आणली आहे.

माणसाला उत्तम आरोग्य लाभावे..काही होऊच नये हे उत्तम.पण तरीही अशा स्त्रोस्त्रांच्या केवळ ऐकण्याने जर त्यावर काही काळ मात होत असेल तर अशी स्त्रोस्त्रे रोज तुमच्या घरात ..घरातील वातावरणात भारली गेली पाहिजेत.

आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन `गीर्वाणवाणी` मध्ये आजही सकाळी सहा ते सातच्या दरम्यान सस्कृंतमधील ही स्त्रोस्त्रे नित्यमियमाने ऐकविली जातात.. उत्तम उच्चारण आणि संस्कृतचा योग्य आणि सुस्पष्ट वापर...यातून विविध संस्कृतची ही स्त्रोस्त्रे..पुन्हा पुन्हा नव्हे..रोज ऐकाविशी वाटतात...याची सुरवात करणा-या सौ. वैभवी श्रीकांत शेटे यांनी आता या स्त्रोस्त्रपठणाच्या सीडी तयार केल्या आहेत. पूर्वी त्या स्वतः याची निर्मिती करायच्या पण आता फौउंटनचे कांतीलाल ओसवाल यांनी आपल्या कंपनीच्याद्वारे या तीन भागातल्या `अखिलम् मधुरम्` ची निर्मिती बाजारात आणली.

उत्तम निर्मितीमूल्ये असलेली ही सीडी. असून त्यासोबत श्र्लोकांची माहिती देणारी पुस्तीकाही आहे. त्यात मूळ संस्कृत स्त्रोस्त्र..त्याचा मराठीत अर्थ आणि त्याचाच इंग्रजीत केलेला अनुवादही नव्याने समाविष्ट केला आहे.

`पारंपारिक पध्दतीने होणा-या स्त्रोस्त्रपठणाऐवजी स्त्रोस्त्राचा आशय, आत्मा न गमावता मुख्य गाभा कायम ठेऊन, निरनिराळ्या रागात बांधलेले व अत्यंत श्रवणीय असेच अखिलम् मधुरम्`चे वर्णन करावे लागेल.`

संस्कृत श्लोकगायनासाठी आवश्यक असलेले सुस्पष्ट, तरीही सहज उच्चारण. मुळात गोड असलेला व शास्त्रीय संगीताचा बैठक लाभल्याने अधिकच सुरेल झालेला स्वर. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या स्त्रोस्त्रांवर असलेल्या गाढ श्रध्देमुळे स्वरांत उतरलेले मंगलभाव... या सा-यातून ही तीन भागांची स्त्रोस्त्रपठण मालिका ऐकणा-याचे कान, मन आणि घर प्रसन्न करेल यात शंका नाही.

केवळ व्यवसाय हाच याचा उद्देश नाही. तर यातल्या काही स्त्रोस्त्रांच्या केवळ ऐकण्यामुळे..रक्तदाब, निद्रानाश, डोळ्यावरचा ताण नाहीसा होणे, मन शांत होणे असे काही शारीरीक आरोग्य सुधारण्यास यातील काही स्त्रोस्त्रांची मदत होईल. आरोग्यला हितकारक अशा गोष्टी यात असल्यामुळे काळ पाहून ती स्त्रोस्त्रे ऐकली तर तुम्ही नक्कीच अधिक आनंददायी बनाल.

देशातल्या सर्व सीडीदुकानात ह्यास्त्रोस्त्राची सीडी उपलब्ध आहे.



http://www.justdial.com/Pune/fountain-music-company-%3Cnear%3E-budhwar-peth/020PXX20-XX20-110916115447-Q6G5

Tuesday, April 24, 2012

Musical Relationship with Commitment


We at Fountain Music Company take the pride to introduce ourselves as "Friends of Music Lovers" of this enciting and evergrowing music industry.

Fountain Music Company, headed by Mr. Kantilal T. Oswal, has been in the music industry for more than two musical decades and also has been a leader in the distribution of reputed labels.

Fountain Music company was established specifically to promote Indian music recordings. In a span of 5 years Fountain Music Company holds more than thousand tiltles in Classical, Devotional, Instrumental and Educational categories. The company has released over thousands of titles on compact discs and cassettes, and will continue to release the best of Indian music. Our excellence in the quality of our products has always kept us in the top echelon in this highly competitive market.

From Traditional to Contemporary, from Classical to Devotional, from Qawalies to Bhajans, from Educational to Pop to Instrumental, all genres have their own space in India and Fountain Music Company has been diligently catering to each such category.

We invite you to experience our site, which presents the golden sounds and tunes of Indian music. Our focus is to keep improving and expand the horizons from India to the world by providing quality and contemporary entertainment to the consumers. Enjoy our site and let us know what we can do to make it more enjoyable for you.

A word from the Director

"I would like to wish all our listeners a happy musical relationship. As a part of our commitment we promise to give you the best in music in this new millenium."

Kantilal Oswal
Chairman, Fountain Music Company
Friends of Music Lovers

Fountain Music Company,
580, Budhwar Peth, Dattakripa Apt. Ambekar Lane,
Opp. Vasant Theatre,
Pune- 411 002
Off- 020- 24491670

Web site- www.fountainmusiccompany.com
Email- fountainmusic@yahoo.com



Fountain Music Company,
580, Budhwar Peth, Dattakripa Apt. Ambekar Lane,
Opp. Vasant Theatre,
Pune- 411 002
Off- 020- 24491670

Web site- www.fountainmusiccompany.com

Saturday, December 3, 2011

अपंग समाजाला आज जागे करण्याची गरज

राळेगणसिध्दी-(ऩगर), दि. ३ डिसेंबर-
अपंग शाहिर विजय तनपुरे यांच्या या सीडीतून तरुणांना प्रेरणा मिळेल याची खात्री ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. जागतिक अपंग दिनाच्या दिवशी शिवशाहिर विजय तनपुरे यांनी साकारलेल्या आणि फौंउंटन म्यूझिक कंपनीने निर्मिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील चरित्र कथेच्या `शिवायण`या व्हीसीडीचे प्रकाशन करताना पद्मावती मंदिरात अण्णा हजारे बोलत होते.

जागतिक अपंग दिनानिमित्त या व्हीसीडीचे प्रकाशन करताना अण्णा हजारे बोलताना सांगतात, अपंग हे शरिराने असले तरी मनाने अनेक अपंग आहेत ते आंधळपणाने झोपी गेले आहेत. त्यांना जागविण्याची गरज आहे. कान असून बहिरे..डोळे असून आंधळे आहेत त्या अपंग समाजाला आज जागे करण्याची गरज आहे. त्यांना समाजातले दुःख दिसने की नाही...याचा विचार करण्याची वेळ आहे...या शाहिराने तयार केलेल्या सीडीतून तरुणांना नक्की प्ररणा मिळे्ल..पण त्यासाटी समाजाने जागे व्हायला हवे...
यासाठी आपल्या व्यस्त वेळेत अण्णा हजारे यांनी या प्रकाशन समारंभासाठी वेळ दिला आणि उपस्थित विद्यार्थी वर्ग आणि नागरीकांसमोर आपले मनोगत मोकळ्या मनाने प्रगट केले.
शिवरायांचा आदर्श आजच्या काळात डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. माणसांना स्वतःसाठी न जगता देशासाठी राष्ट्रासाठी कसे जगावे याचे शिवचरित्र हे उदाहरण आहे,असे अण्णा म्हणाले

स्वतःसाठी सगळेच जगतात..पण समाजासाटी जे जगतात आणि मरण पत्करतात तेच समाजाच्या लक्षात राहतात..तेव्हा सुंदर विचार, विष्कलंक जीवन आणि समाजासाठी त्याग करायला विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे, असे आवाहन अण्णा जमलेल्या शालेय मुलांना उद्देशुन केले.
राष्ट्राकरीता कसे जगावे हे शिकविले छत्रपती शिवाजी महाराज यांनी , तर मरावे कसे हे शिकविले छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रातून..आज भ्रष्ट्राचाराच्या काळात शिवछत्रपतींचे चरित्र तरुणांना स्फूर्ति देईल याची खात्री शिवशाहिर विजय तनपुरे यांनी दिली.

पारतंत्र्याच्या अंधारातून बाहेर पडण्यासाठी आणि सदाचाराचा सूर्य उगविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे
चरित्र शिवशाहिर विजय तनपुरे या चरित्रग्रंथाच्या आधारे महाराष्ट्रात पोहोचविण्याचे काम करतात.
ते स्वतः अपंग असून अपंगांसाठी आधार विकास अपंग संस्था ,राहुरी या संस्थेच्या वतीने कार्य करीत असतात.

या `शिवायण`चे संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम करण्यात येणार असून त्यातून जमा झालेल्या निधीचा विनियोग अपंगांच्या कल्याणासाठीच्या योजनेसाठी वापरण्यात येणार आहे, असे तनपुरे सांगतात.

पुण्याच्या `फौंऊंटन म्यूझिक कंपनी`ने निर्मित केलेल्या या व्हीसाडीत ह.भ.प.सुनिल पोरे, रमेश जाधव, गोकूळ शेजुळ, अरुणभैय्या पगारे, जगन्नाथ जाधव, अर्जून तनपुरे, बाळकृष्ण तनपुरे या कलावंताच्या मदतीने तयार झाली आहे.

पुण्याच्या `फौंऊंटन म्यूझिक कंपनीच्यावतीने महेंद्र ओसवाल हे या समारंभासाठी मुद्दाम उपस्थित होते. अण्णांच्या भेटीसाठी आलेल्या असंख्य लोकांनी आणि जमलेल्या प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी या शिवायण या व्हीसीडीची दखल घेऊन विजय तनपुरे यांच्या कार्याची नोंद घेतली

Wednesday, November 30, 2011

`शिवायण`चे प्रकाशन शनिवारी अण्णां हजारे यांच्या हस्ते


जागतिक अपंग दिनानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांची संगीत चरित्र कथा अपंग शाहिर विजय तनपुरे यांनी `शिवायण` या नावाने तयार केली असून या व्हीसीडीचे प्रकाशन ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णां हजारे यांच्या हस्ते
३ डिसेंबरला (शनिवारी) सकाळी साडेनऊ वाजता राळेगणसिध्दी येथे होणार आहे.

राष्ट्राकरीता कसे जगावे हे शिकविले छत्रपती शिवाजी महाराज यांनी , तर मरावे कसे हे शिकविले छत्रपती
संभाजी महाराजांच्या चरित्रातून..

पारतंत्र्याच्या अंधारातून बाहेर पडण्यासाठी आणि सदाचाराचा सूर्य उगविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे
चरित्र शिवशाहिर विजय तनपुरे या चरित्रग्रंथाच्या आधारे महाराष्ट्रात पोहोचविण्याचे काम करतात.
ते स्वतः अपंग असून अपंगांसाठी आधार विकास अपंग संस्था ,राहुरी या संस्थेच्या वतीने कार्य करीत असतात.

या `शिवायण`चे संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम करण्यात येणार असून त्यातून जमा झालेल्या निधीचा विनियोग अपंगांच्या कल्याणासाठीच्या योजनेसाठी वापरण्यात येणार आहे, असे तनपुरे सांगतात.

पुण्याच्या `फौंऊंटन म्यूझिक कंपनी`ने निर्मित केलेल्या या व्हीसाडीत ह.भ.प.सुनिल पोरे, रमेश जाधव, गोकूळ शेजुळ, अरुणभैय्या पगारे, जगन्नाथ जाधव, अर्जून तनपुरे, बाळकृष्ण तनपुरे या कलावंताच्या मदतीने तयार झाली आहे.

छत्रपतींची महती माहित असलेल्या सा-यांनाच ही व्हीसीडी आवडेल अशी तनपुरे यांना खात्री आहे.

Saturday, November 19, 2011

संस्कृतीच्या पाऊलखुणा जपणारी `देवघर`




`देवघर`, आज प्रत्येकाच्या घरात नाहीसे होत गेले आहे. एकेकाळी याच देवघराचे स्थान अढळ होते. काळाने आणि नव्या काळाने ती देवघरे लोप पावत चालली आहेत. माणसाला सावरायला लावणारं हे श्रद्धास्थान. अध्यात्म आणि मानवी भावनांचं नातं सागणारं देवघर काय होत. ती गावागावात रुजलेल्या संस्कृतीत देवघराचे श्रेष्ठत्व कशात होते ते सांगणारा नवा अल्बम फौऊंटन म्यूझिक कंपनीने प्रकाशित केला आहे.

साधना सरगम, रविंद्र साठे या जुन्या गायकांबरोबरच –हषिकेश कामेरकर आणि अलिकडेच लोकप्रिय असलेला अमेय दाते यांच्या आवाजाची जादू अनुभवायला देणारी गीते देवघरच्या अब्लममध्ये ऐकता येणार आहेत.

`तेच आहे माझे घर`, या साधना सरगम यांनी गायलेल्या गीतामधून ही सारी देवघराची महती आणि त्याचे जुनेपण जपलेपण ऐकताना मन भारावून जाते.

आजच्या नव्या पीढीलाही या `जुने ते सोने` हे सांगताना त्यातल्या भावनांना वाट करुन दिलेली आहे ती गीतकार संजय चुरुमुरे यांनी. वर्षभर या कल्पनेवर काम करून दहा गीतांचे लेखन त्यांनी केले. मानसिंग जावीर यांनी संगीत दिलेल्या या अल्बमला कांतीभाई ओसवाल यांनी विश्वासपूर्वक न्याय दिल्याचे गीतकार संजय चुरुमुरे सांगतात.

आपण ही गाणी गाऊ शकू की नाही अशी साशंकता अमेय दाते यांच्या मनात होती. पण संगीत संयोजक मधू रेडकर आणि गीतकार चुरुमुरे यांना त्यांच्या वेगळ्या आवाजाची महती पुरेपुर पटल्यानेच अमेय दाते तयार झाले. यांच्या आवाजातली दोन्हीही गीते सुंदर बनली आहेत.

अच्युत पालव यांनी आपल्या रेखाटनातून अल्बमचे रेखाटन करून कव्हरला जुन्या पैठणीचा मुखडा दिल्याने ते भावनांचे भारावलेपण पाहताक्षणीच मनात ठसते.

घरातल्या कोप-यात समयीनं उजळलेलं हे देवघर....इथे होणारा नादमधुर घंटानाद.... आणि मंद तेवणारी समयी... सा-यांचा भास तुम्हालाही ह्या संग्रहातली सगळी गाणी ऐकताना नक्की होईल यांची खात्री वाटते. तुम्ही आनंद देणारं संगीत आणि घंटांच्या अनाहत नादात बुडून जाणार आहात.

ह्यामागे सर्वात जास्त पाठबळ आणि कष्ट मधू रेडकर यांनी उचलले आहे. आजच्या संस्कृती विसरत चाललेल्या काळात देवघर सारख्या अल्बमची निर्मिती करण्याचे धाडस फौऊंटन या कंपनीने केले आहे. आज केवळ १०० रुपयात ती सर्वत्र उपलब्ध आहे.

Tuesday, November 15, 2011

मनामनात पोचलेले नाव

रसिकांच्या –वाचकांच्या मनामनात पोचलेले एक विश्वसनिय नाव
फौंऊंटन म्यूझिक
Fountain Music Company



कांतीलाल ओसवाल















आमच्यावर लोभ असणा-या रसिक वाचकहो नमस्कार,

डिजीटल तंत्राच्या काळात आणि इंटरनेटच्या वाढत्या प्रसाराने कॅसेट, सीडीज् आणि व्हिडीओ विक्रीचा व्यवसाय आम्ही निष्ठेने आणि दर्जा व गुणवत्ता कायम ठेऊन १९९५ पासून करत आहोत.

तंत्रज्ञानातला बदल लक्षात घेऊनच ब्लॉग, फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातूनही फौंऊंटन म्यूझिक कंपनीचा वाढता पसारा आणि लोकप्रियता कायम ठेवण्यासाठी आमचे या क्षेत्रातले स्नेही श्री. सुभाष इनामदार यांच्या सहाय्याने नेटच्य़ा मायाजालात आपले अस्तित्व नोंदण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणूनच हा फौंऊंटन म्यूझिक कंपनीचा ब्लॉग सुरु करीत आहोत.

आमच्या घराण्यात कुणी संगीत क्षेत्रात नव्हते. पण १९८० पासून कॅसेट विक्रीच्या व्यवसायाच्या निमित्ताने या क्षेत्रातील लोकांशी परिचय झाला. भारतातले मार्केटिंग समजले... उमजले. इतरांनी निर्माण केलेल्या कॅसेट विकता विकता आपण स्वतःची निर्मिती करावी असा विचार बळावला आणि १९९५ मध्ये `फौंऊंटन म्यूझिक कंपनी`ची रितसर सुरवात झाली.

सुरवातीच्या कॅसेट काढल्या त्या बालगोष्टींच्या. पीडीएचे कलावंत घेऊन रामायण, महाभारत आणि पंचतंत्रातल्या गोष्टीच्या कॅसेटची निर्मिती केली. हळूहळू जसजसा प्रतिसाद मिळू लागला तसतसे एकेक पाऊल पुढे टाकायला सुरवात केली.
वपुंचे `वपूर्झा` ह्या त्यांच्याच पुस्तकाचे त्यांनी केलेल्या वाचनाची कॅसेट काढली.

रणजीत देसाई यांच्या `पावनखिंड` या कादंबरीचे नाट्यमय वाचन या माध्यमातून बाजारात उपलब्ध करून दिले. कॅसेटवर कादंबरीची निर्मिती करुन ज्यांना वाचता येत नाही त्यांना हे ऐकण्याचे माध्यम मिळाले. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.

भक्तीगीते, भावगीतांची निर्मिती करतानाच खेडेगावात परंपरेने राखले जाणारे किर्तन, अभंग आणि प्रवचन यांची निर्मीती करुन लोकसंगीताचा हा बाज महाराष्ट्राच्या लोकांनी डोक्यावर घेतला. उदाहरण देताना..गोदावरीबाई मुंडे यांचे अभेग..
. निवृत्ती महाराज देशमुख यांचे सांप्रदायिक कीर्तन. आणि पोतराज रस्त्यांवर सादर करतात त्या कथा शिवरंजनी स्टुडिओत पोतराजला आणून रेकॉर्ड करुन घेतल्या.

साधारण २००२ पासून व्हीडिओ सीडीच्या काळ सुरु झाला. त्यातही आम्ही काम सुरु केले. Animated व्हिडीओतून रामायण, महाभारत, कृष्ण, गणपतीच्या कथा, पंचतंत्र, इसापनितीतील गोष्टी व्हिडीओव्दारे तयार केल्या.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील Animated Video काढला. त्याचे उदघाटन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाल्याचे मुद्दाम सांगावेसे वाटते.


अष्टविनायकांचे थेट दर्शन घडविणारी आणि वपुंनी निवेदन केलेली व्हिडीओ ध्वनीफितही गाजली.

याशिवाय १५० चे वर मराठी नाटके आणि १४ संगीत नाटके व्हिडोओ सीडीतून रसिकांच्या पसंतीला उतरली. चंद्रलेखाची सगळी ...वा-यावरची वरात, ती फुलराणी, रणांगण सगळीच.
इतर संस्थांचीही उदा. नथुराम गोडसे सारखी नाटकेही व्हीडीओत आली. याचे सारे श्रेय अविनाश खर्शीकर यांना जाते. ते याचे कार्यकारी निर्माते आहेत.
आत्तापर्यत चारएक हजार टायटल्सची निर्मीती फौंऊंटनेने केली आहे. यात शास्त्रीय, सुगम, भक्तीगीत, भावगीत, लोकसंगीत
आणि काहींचे अल्बमस् सारेच या माध्यमातून रसिकांच्या दारी नेले.

सांगायला मोठा आनंद होतोय की, संदीप खरे आणि संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या सगळ्या निर्मिती सीडीतून रसिकांच्या दारी नेल्या. त्याला प्रतिसादही तेवढा जबरदस्त लाभला.

पायरसीचा धोका गृहित धरुनही या व्यवसायात स्वतःची पत कधीही ढासळू न देता महिन्याला किंमान ६-७ टायटल्स बाजारात येतात. खपतात आणि फौंऊंटनचे नाव यशस्वी करतात. मराठी , गुजराती आणि कन्नड भाषेतही आमचे काम आहे.

शास्त्रीय संगीतात संजीव अभ्यंकर, डॉ. अश्विनी भिडे- देशपांडे, शौनक अभिषेकी, सावनी शेंडये-साठे असे कितीतरी कलावंत फौंऊंटनला लाभले. अनेक लोक आमची सीडी करा म्हणून येतात. पण दर्जा आणि लोकांचा विश्वास बसेल अशा निवडक लोकांचे अल्बम बाजारात आणले जातात.

आम्ही `पांढर` चित्रपटाची निर्मिती केली. त्याला सर्वात्तम ग्रामिण चित्रपटाचा महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार प्राप्त झाला. त्याचे दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांचे होते. यात निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू सिंहासन नंतर एकत्र आले होते. गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शित केलेला `हाउसफुल्ल` चित्रपटात भरत जाधव, वर्षा उसगावकर, मोहन जोशी प्रमुख भुमिकेत होते.
२००९ मध्ये `जावई बापू जिंदाबाद` हा विजय पाटकर यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपटही फौंऊंटनच्या वतीनेच निर्माण करण्यात आला होता.

एकूणच निर्मीती करताना स्वतःला आनंद आणि व्यवसाय दोन्हीही पाहून टायटल्स तयार केली जातात. मी स्वतः यात लक्ष घालून व्यवसायाला दिशा देतो.. निर्णय घेतो. काळाप्रमाणे बदलण्याचे ठरवून आता पूर्वीच्या सा-या कॅसेटवरील कामाचे डिजीटलायझेशन करण्याचे काम सुरु आहे.

मुंबई आणि पुण्यातून हा सारा निर्मितीचा कारभार चालतो.. स्वतःचा रेकॉडिंग स्टुडिओ न ऊभा करता लागेल तसा तो भाड्याने घेऊन काम सुरू आहे. आता यानिमित्ताने पुढे येणारे सारेच आणि कांही मागचे आठवणीत राहिलेले प्रकल्प तुमच्यासोबत शेअर करणार आहोत.

यापूर्वी जशी दाद दिली तशीच शाबासकीची थाप याही माध्यमातून द्याल याची खात्री व्यक्त करून इथेच थांबतो.


आपला,
कांतीलाल ओसवाल,
संचालक,
फौंऊंटन म्यूझिक कंपनी, पुणे

Fountain Music Company,
580, Budhwar Peth, Dattakripa Apt. Ambekar Lane,
Opp. Vasant Theatre,
Pune- 411 002
Off- 020- 24491670

Web site- www.fountainmusiccompany.com
Email- fountainmusic@yahoo.com



Fountain Music Company,
580, Budhwar Peth, Dattakripa Apt. Ambekar Lane,
Opp. Vasant Theatre,
Pune- 411 002
Off- 020- 24491670

Web site- www.fountainmusiccompany.com
Email- fountainmusic@yahoo.com