Saturday, November 19, 2011

संस्कृतीच्या पाऊलखुणा जपणारी `देवघर`




`देवघर`, आज प्रत्येकाच्या घरात नाहीसे होत गेले आहे. एकेकाळी याच देवघराचे स्थान अढळ होते. काळाने आणि नव्या काळाने ती देवघरे लोप पावत चालली आहेत. माणसाला सावरायला लावणारं हे श्रद्धास्थान. अध्यात्म आणि मानवी भावनांचं नातं सागणारं देवघर काय होत. ती गावागावात रुजलेल्या संस्कृतीत देवघराचे श्रेष्ठत्व कशात होते ते सांगणारा नवा अल्बम फौऊंटन म्यूझिक कंपनीने प्रकाशित केला आहे.

साधना सरगम, रविंद्र साठे या जुन्या गायकांबरोबरच –हषिकेश कामेरकर आणि अलिकडेच लोकप्रिय असलेला अमेय दाते यांच्या आवाजाची जादू अनुभवायला देणारी गीते देवघरच्या अब्लममध्ये ऐकता येणार आहेत.

`तेच आहे माझे घर`, या साधना सरगम यांनी गायलेल्या गीतामधून ही सारी देवघराची महती आणि त्याचे जुनेपण जपलेपण ऐकताना मन भारावून जाते.

आजच्या नव्या पीढीलाही या `जुने ते सोने` हे सांगताना त्यातल्या भावनांना वाट करुन दिलेली आहे ती गीतकार संजय चुरुमुरे यांनी. वर्षभर या कल्पनेवर काम करून दहा गीतांचे लेखन त्यांनी केले. मानसिंग जावीर यांनी संगीत दिलेल्या या अल्बमला कांतीभाई ओसवाल यांनी विश्वासपूर्वक न्याय दिल्याचे गीतकार संजय चुरुमुरे सांगतात.

आपण ही गाणी गाऊ शकू की नाही अशी साशंकता अमेय दाते यांच्या मनात होती. पण संगीत संयोजक मधू रेडकर आणि गीतकार चुरुमुरे यांना त्यांच्या वेगळ्या आवाजाची महती पुरेपुर पटल्यानेच अमेय दाते तयार झाले. यांच्या आवाजातली दोन्हीही गीते सुंदर बनली आहेत.

अच्युत पालव यांनी आपल्या रेखाटनातून अल्बमचे रेखाटन करून कव्हरला जुन्या पैठणीचा मुखडा दिल्याने ते भावनांचे भारावलेपण पाहताक्षणीच मनात ठसते.

घरातल्या कोप-यात समयीनं उजळलेलं हे देवघर....इथे होणारा नादमधुर घंटानाद.... आणि मंद तेवणारी समयी... सा-यांचा भास तुम्हालाही ह्या संग्रहातली सगळी गाणी ऐकताना नक्की होईल यांची खात्री वाटते. तुम्ही आनंद देणारं संगीत आणि घंटांच्या अनाहत नादात बुडून जाणार आहात.

ह्यामागे सर्वात जास्त पाठबळ आणि कष्ट मधू रेडकर यांनी उचलले आहे. आजच्या संस्कृती विसरत चाललेल्या काळात देवघर सारख्या अल्बमची निर्मिती करण्याचे धाडस फौऊंटन या कंपनीने केले आहे. आज केवळ १०० रुपयात ती सर्वत्र उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment