Sunday, April 29, 2012

चिंटूतील गाणी आता सीडीतून ऐकता येणार


आरंभी सकाळ . काही वर्षे लोकसत्ता आणि परत फिरुन माघारी सकाळमध्ये रोज दिसणारी कार्टून स्ट्रीप चिंटू मधली चिंटू, मिनी, मिनी, बगळ्या, पप्पू..सारीच आता श्रीरंग गोडेबोले यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातून साकारली गेली आहे. त्यातल्या गाण्याची फौंऊंटन म्यूझिकने तयार केलेल्या सीडीचे प्रकाशन बुधवारी "मनसे'चे अध्यक्ष व व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.



"चिंटू'चे जनक प्रभाकर वाडेकर आणि चारुहास पंडित, चिंटूंची भूमिका करणारा शुभंकर अत्रे, त्याच्या आईची भूमिका करणारी विभावरी देशपांडे, गीतकार संदीप खरे, संगीतकार सलिल कुलकर्णी यांनी आपल्या भावना या वेळी व्यक्त केल्या. या "चिंटू'साठी पार्श्व गायन करणारा शुभंकर कुलकर्णी याने एक गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, निर्माते अभय गाडगीळ, फौंऊंटन म्यूझिकचे कांतिलाल ओसवाल आदी उपस्थित होते.



'चिंटू म्हणजे आनंदाचे क्षण आहेत. प्रत्येक घरातील ते वातावरण आहे. त्याचा चित्रपट होतो आहे, याचा आनंद तर आहेच; पण उत्सुकतादेखील आहे. "चिंटू'द्वारे रोज भेटणारी पात्रे चित्रमालिकेतील पात्रांसारखी हुबेहूब दिसणारी आहेत. त्यांना फिरताना, खोड्या करताना पाहणे रोमांचकारी होते,'' अशी भावना चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment