राळेगणसिध्दी-(ऩगर), दि. ३ डिसेंबर-
अपंग शाहिर विजय तनपुरे यांच्या या सीडीतून तरुणांना प्रेरणा मिळेल याची खात्री ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. जागतिक अपंग दिनाच्या दिवशी शिवशाहिर विजय तनपुरे यांनी साकारलेल्या आणि फौंउंटन म्यूझिक कंपनीने निर्मिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील चरित्र कथेच्या `शिवायण`या व्हीसीडीचे प्रकाशन करताना पद्मावती मंदिरात अण्णा हजारे बोलत होते.
जागतिक अपंग दिनानिमित्त या व्हीसीडीचे प्रकाशन करताना अण्णा हजारे बोलताना सांगतात, अपंग हे शरिराने असले तरी मनाने अनेक अपंग आहेत ते आंधळपणाने झोपी गेले आहेत. त्यांना जागविण्याची गरज आहे. कान असून बहिरे..डोळे असून आंधळे आहेत त्या अपंग समाजाला आज जागे करण्याची गरज आहे. त्यांना समाजातले दुःख दिसने की नाही...याचा विचार करण्याची वेळ आहे...या शाहिराने तयार केलेल्या सीडीतून तरुणांना नक्की प्ररणा मिळे्ल..पण त्यासाटी समाजाने जागे व्हायला हवे...
यासाठी आपल्या व्यस्त वेळेत अण्णा हजारे यांनी या प्रकाशन समारंभासाठी वेळ दिला आणि उपस्थित विद्यार्थी वर्ग आणि नागरीकांसमोर आपले मनोगत मोकळ्या मनाने प्रगट केले.
शिवरायांचा आदर्श आजच्या काळात डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. माणसांना स्वतःसाठी न जगता देशासाठी राष्ट्रासाठी कसे जगावे याचे शिवचरित्र हे उदाहरण आहे,असे अण्णा म्हणाले
स्वतःसाठी सगळेच जगतात..पण समाजासाटी जे जगतात आणि मरण पत्करतात तेच समाजाच्या लक्षात राहतात..तेव्हा सुंदर विचार, विष्कलंक जीवन आणि समाजासाठी त्याग करायला विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे, असे आवाहन अण्णा जमलेल्या शालेय मुलांना उद्देशुन केले.
राष्ट्राकरीता कसे जगावे हे शिकविले छत्रपती शिवाजी महाराज यांनी , तर मरावे कसे हे शिकविले छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रातून..आज भ्रष्ट्राचाराच्या काळात शिवछत्रपतींचे चरित्र तरुणांना स्फूर्ति देईल याची खात्री शिवशाहिर विजय तनपुरे यांनी दिली.
पारतंत्र्याच्या अंधारातून बाहेर पडण्यासाठी आणि सदाचाराचा सूर्य उगविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे
चरित्र शिवशाहिर विजय तनपुरे या चरित्रग्रंथाच्या आधारे महाराष्ट्रात पोहोचविण्याचे काम करतात.
ते स्वतः अपंग असून अपंगांसाठी आधार विकास अपंग संस्था ,राहुरी या संस्थेच्या वतीने कार्य करीत असतात.
या `शिवायण`चे संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम करण्यात येणार असून त्यातून जमा झालेल्या निधीचा विनियोग अपंगांच्या कल्याणासाठीच्या योजनेसाठी वापरण्यात येणार आहे, असे तनपुरे सांगतात.
पुण्याच्या `फौंऊंटन म्यूझिक कंपनी`ने निर्मित केलेल्या या व्हीसाडीत ह.भ.प.सुनिल पोरे, रमेश जाधव, गोकूळ शेजुळ, अरुणभैय्या पगारे, जगन्नाथ जाधव, अर्जून तनपुरे, बाळकृष्ण तनपुरे या कलावंताच्या मदतीने तयार झाली आहे.
पुण्याच्या `फौंऊंटन म्यूझिक कंपनीच्यावतीने महेंद्र ओसवाल हे या समारंभासाठी मुद्दाम उपस्थित होते. अण्णांच्या भेटीसाठी आलेल्या असंख्य लोकांनी आणि जमलेल्या प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी या शिवायण या व्हीसीडीची दखल घेऊन विजय तनपुरे यांच्या कार्याची नोंद घेतली
The Musical Fountain, a marvel of engineering and artistry, captivates audiences with choreographed water displays synchronized to music. Its dynamic performances blend water, light, and melody, offering a sensory feast that inspires wonder and joy. As a pioneer in entertainment, it continues to enchant generations, embodying creativity and technical innovation in the realm of public spectacle.
ReplyDelete